तुम्ही शेअर्स ची खरेदी कोठे व किती प्रकारे करू शकता?
आजच्या लेखात आपण पाहणार आहोत की तुमच्या शेअर्स ची खरेदी विक्री कोठे होते? तर चला सुरुवात करूया..... आज प्रत्येक देशाचे स्वतःचे स्टॉक एक्सचेंज आहे आणि प्रत्येक देश मोठ्या प्रमाणात स्टॉक मार्केटवर अवलंबून आहे स्टॉक एक्सचेंज ही ती जागा आहे किंवा इमारत जेथे लोक कंपन्यांचे शेअर्स खरेदी करतात आणि विकतात. बाजारपेठ मुख्यतः दोन प्रकारांमध्ये चालते ती म्हणजे प्राथमिक बाजार व दुय्यम बाजार तर प्राथमिक बाजार म्हणजे काय? प्राथमिक बाजारपेठ अशी आहेे जेथे शेअर्स सर्वात पहिल्यांदा विक्रीस आणतात त्यास IPO असेही म्हणतात व त्यांच्या शेअर किंमती नक्की काय असतील हे कंपन्या ठरवतात यातही काही नियम आहेत त्यामुळे कंपन्या जास्त युक्तीबाजी करु शकत नाहीत कारण त्यापैकी बराचसा भाग मागणीवर अवलंबून असतो. लोक कंपनीच्या समभागांची किती किंमत मोजायला तयार आहेत? कंपनीचे मूल्य 1 लाख रुपये असल्यास, ती कंपनी त्याच्या 1 लाख शेअर्सची विक्री करते आणि प्रति शेअर 1 रुपयाने शेअर्स ऑफर करते जर त्याची मागणी जास्त असेल आणि बर्याच लोकांना त्याचे शेअर्स खरेदी करायचे असतील तर, कंपनी निश्चितपणे आपले शेअर्स 1 रूपायांऐवजी 2...