Posts

तुम्ही शेअर्स ची खरेदी कोठे व किती प्रकारे करू शकता?

आजच्या लेखात आपण पाहणार आहोत की तुमच्या शेअर्स ची खरेदी विक्री कोठे होते? तर चला सुरुवात करूया..... आज प्रत्येक देशाचे स्वतःचे स्टॉक एक्सचेंज आहे आणि प्रत्येक देश मोठ्या प्रमाणात स्टॉक मार्केटवर अवलंबून आहे स्टॉक एक्सचेंज ही ती जागा आहे किंवा इमारत जेथे लोक कंपन्यांचे शेअर्स खरेदी करतात आणि विकतात. बाजारपेठ मुख्यतः दोन प्रकारांमध्ये चालते ती म्हणजे प्राथमिक बाजार व दुय्यम बाजार तर प्राथमिक बाजार म्हणजे काय? प्राथमिक बाजारपेठ अशी आहेे जेथे शेअर्स सर्वात पहिल्यांदा विक्रीस आणतात त्यास IPO असेही म्हणतात व त्यांच्या शेअर किंमती नक्की काय असतील हे कंपन्या ठरवतात यातही काही नियम आहेत त्यामुळे कंपन्या जास्त युक्तीबाजी करु शकत नाहीत कारण त्यापैकी बराचसा भाग मागणीवर अवलंबून असतो. लोक कंपनीच्या समभागांची किती किंमत मोजायला तयार आहेत? कंपनीचे मूल्य 1 लाख रुपये असल्यास, ती कंपनी त्याच्या 1 लाख शेअर्सची विक्री करते आणि प्रति शेअर 1 रुपयाने शेअर्स ऑफर करते जर त्याची मागणी जास्त असेल आणि बर्‍याच लोकांना त्याचे शेअर्स खरेदी करायचे असतील तर, कंपनी निश्चितपणे आपले शेअर्स 1 रूपायांऐवजी 2...

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक का व कशी करावी?

Image
शेअर मार्केट  म्हणजे नेमकं असत तरी काय या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कालच्या लेखात मिळालेले असेलच. तर आज आपण पाहणार आहोत की, शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक का व कशी करावी?  शेअर मार्केट मध्ये इन्व्हेस्ट करायला खूप लोक इच्छुक असतात परंतु याबद्दल चुकीच्या किंवा अपुऱ्या माहितीमुळे ते या गोष्टींमध्ये पडत नाहीत.  शेअर मार्केट मध्ये रिस्क असते पण त्यातून मिळणारा नफा हा त्याच्या कित्येक पटीने अधिक असतो त्यामुळे जरी रिस्क असली तरी इन्वेस्टर्स नेहमी गुंतवणूक करण्यास उत्सुक असतात. .जेव्हाही नवीन लोक अपुऱ्या माहिती ने मार्केट मध्ये येतात तेव्हा ते फसतात. माझ्या मते अपुऱ्या माहितीशिवाय शेअर मार्केट मध्ये उतरणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे आहे. शेअर मार्केटला काही लोक जुगार असं देखील म्हणतात पण माझ्या मते तो एक  बुद्धीचा खेळ  आहे. या खेळात कोणीही उतरू शकतो व पैसे कमवू शकतो. तर शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यानंतर नफा कसा मिळतो याबद्दल आपण पाहूया. जर एखाद्या कंपनीच्या शेअर ची किंमत 1000 रुपये आहे व तुम्ही त्या कंपनीचे 100 शेअर्स खरेदी केलेले आहे म्हणजे तुम्ह...

शेअर मार्केट म्हणजे नेमकं काय?

Image
 नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट माहितीच्या पहिल्या लेखात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजपासून आपण शेअर मार्केट बद्दल दररोज 1 लेख या page वर share करणार आहोत आणि तेही मराठीत.. चला  तर शेअर मार्केट बद्दल थोड बोलूया शेअर मार्केट म्हणजे काय?  आपण शेअर मार्केट बदल सर्व माहीत अतिशय सुंदर पद्धतीने सांगितली आहे याचा उपयोग नवीन गुंतावूकदारांना नक्कीच होईल शेअर बाजार ही एक बाजारपेठ आहे. जिथे आपण कंपनीचे शेअर्स खरेदी किंवा विक्री करू शकता एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करणे म्हणजे त्या कंपनीच्या मालकीची काही टक्के रक्कम खरेदी करणे म्हणजेच आपण त्या कंपनीच्या टक्केवारीचे मालक आहात.जर ती कंपनी नफा कमावते तर त्या नफ्यातील काही टक्के रक्कम आपल्यालाही दिली जाईल, जर त्या कंपनीचे नुकसान झाले तर त्या नुकसानाची टक्केवारीसुद्धा आपणालाच सहन करावी लागते. छोट्या प्रमाणावर याचे उदाहरण सांगायचं म्हणजे आपल्याकडे 10,000 रुपये आहेत, परंतु ते आपला व्यवसाय वाढवण्यासाठी पुरेसे नाहीत तर, आपण आपल्या मित्राकडे गेलो आणि त्याला सांगितल की मला १०००० रुपयांची गरज आहे वझर तू मला हे दहाा हजार रुपये दिले तर मी तुला त...