शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक का व कशी करावी?
शेअर मार्केट म्हणजे नेमकं असत तरी काय या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कालच्या लेखात मिळालेले असेलच.
तर आज आपण पाहणार आहोत की,
शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक का व कशी करावी?
शेअर मार्केट मध्ये इन्व्हेस्ट करायला खूप लोक इच्छुक असतात परंतु याबद्दल चुकीच्या किंवा अपुऱ्या माहितीमुळे ते या गोष्टींमध्ये पडत नाहीत.
शेअर मार्केट मध्ये रिस्क असते पण त्यातून मिळणारा नफा हा त्याच्या कित्येक पटीने अधिक असतो त्यामुळे जरी रिस्क असली तरी इन्वेस्टर्स नेहमी गुंतवणूक करण्यास उत्सुक असतात.
.जेव्हाही नवीन लोक अपुऱ्या माहिती ने मार्केट मध्ये येतात तेव्हा ते फसतात.माझ्या मते अपुऱ्या माहितीशिवाय शेअर मार्केट मध्ये उतरणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे आहे. शेअर मार्केटला काही लोक जुगार असं देखील म्हणतात पण माझ्या मते तो एक बुद्धीचा खेळ आहे. या खेळात कोणीही उतरू शकतो व पैसे कमवू शकतो.
तर शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यानंतर नफा कसा मिळतो याबद्दल आपण पाहूया.
जर एखाद्या कंपनीच्या शेअर ची किंमत 1000 रुपये आहे व तुम्ही त्या कंपनीचे 100 शेअर्स खरेदी केलेले आहे म्हणजे तुम्ही 1 लाख रुपये गुंतवणूक केलेली आहे.
जर भविष्यात त्या शेअर्स ची किंमत 1200 रुपये प्रतिशेअर झाली तर प्रत्येक शेअर मागे तुम्हाला 200 रुपये नफा मिळेल.
प्रत्यक्षात तुमच्याकडे 100 शेअर्स होते जे तुम्ही 1000 रुपये प्रतिशेअर ला विकत घेतलेले होते आणि तेच शेअर्स तुम्ही 1200 रुपये प्रतिशेअर ने विकणार आहात
म्हणजेच 200×100=20000(वीस हजार रुपये)तुमचा निव्वळ नफा होतो.
अशाच प्रकारे शेअर मार्केट मध्ये खूप सारे लोक कमी किमतीत शेअर्स खरेदी करतात व जेव्हाही त्या शेअर्सची किंमत वाढेल तेव्हा ते विकून बक्कळ पैसे कमवतात.
शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी पहिली पायरी असते ती म्हणजे demat account
Demat account द्वारे तुम्ही शेअर्स ची खरेदी व विक्री करता
https://upstox.com/open-account/?f=3YBDT9

Comments
Post a Comment